रविवार, २ जुलै, २०१७

पाशा पटेल यांची राज्य कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षपदी निवड - ३ जुलै २०१७

पाशा पटेल यांची राज्य कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षपदी निवड - ३ जुलै २०१७

* भाजपचे नेते माजी आमदार पाशा पटेल यांची राज्य कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षपदी निवड मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

* शेतमालाचा उत्पादन खर्च काढणे, त्या संदर्भात केंद्रीय कृषी मूल्य आयोगाला शिफारशी करण्याचे काम राज्य कृषी आयोग करत असतो.

* राज्य शेतमाल समिती आतापर्यंत अस्तित्वात होती. राज्यात आयोगाची स्थापना पहिल्यांदाच करण्यात आली.

* शरद जोशी यांच्या नेतृत्वात अनेक वर्षे शेतकरी संघटनेचे बिनीचे शिलेदार राहिलेले पाशा पटेल हे शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळाला पाहिजे. यासाठी ते सतत आग्रही राहिले.

* तसेच या मागणीसाठी २०११ साली त्यांनी लातूर ते नागपूर अशी २४ दिवसांची पदयात्रा काढली. ते विधानपरिषदेचे माजी सदस्य असून भाजपच्या किसान मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.