सोमवार, २४ जुलै, २०१७

महिकोचे संस्थापक बद्रीनारायण बारवाले यांचे निधन - २५ जुलै २०१७

महिकोचे संस्थापक बद्रीनारायण बारवाले यांचे निधन - २५ जुलै २०१७

* महिकोच्या माध्यमातून भरपूर उत्पादन देणारे बियाणे उपलब्द करून देत क्रांती घडवून आणणारे उद्योजक आणि स्वतंत्रसैनिक बद्रीनारायण बारवाले वय [८६] यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले.

* महाराष्ट्र हायब्रीड सीड कंपनीचे महिको अध्यक्ष संस्थापक असलेल्या बद्रीनारायण बारवाले यांनी जालना जिल्ह्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून दिली.

* बियाणे निर्मितीत त्यांनी घडविलेल्या क्रांतीमुळे बियाणे उद्योग हे एक स्वतंत्र औद्योगिक क्षेत्र म्हणून ओळखले जाऊ लागले.

* भारत सरकारने २००१ मध्ये त्यांचा [ पदमभूषण ] पुरस्कार देऊन गौरव केला. १९९८ मध्ये त्यांना अमेरिकेच्या वर्ल्ड फूड प्राईझ हा बहुमान मिळाला.

* तसेच विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाचा राष्ट्रीय संशोधन पुरस्कार, इंटरनॅशनल सीड्स अँड सायन्स टेक्नॉलिजी पुरस्कार, १९९६ मध्ये फेडरेशन सीड्स मॅनचे मानद सदस्यही देण्यात आले. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.