शनिवार, २९ जुलै, २०१७

आरबीआय दोनशेची नोट चलनात आणणार - २९ जुलै २०१७

आरबीआय दोनशेची नोट चलनात आणणार - २९ जुलै २०१७

* नवी २०० रुपयाची नोट येत्या १५ ऑगस्ट रोजी चलनात येण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार व्यवहारात नवी २०० ची नोट सादर करण्याचा अंतिम टप्प्यात रिझर्व्ह बँक आहे.

* आणि कदाचित १५ ऑगस्टपूर्वी देखील ती उपलब्द होण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बँकेने काही दिवसापूर्वीच २०० रुपयाच्या नोटेचा प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावानंतर २०० नोटांच्या छपाईत सुरुवात केली गेली.

* होशंगाबाद येथे येथील सरकारी प्रेसमध्ये २०० नोट तयार झाली असून आता सिक्युरिटी फिचर आणि क्वालिटी तपासली जात असल्याचे कळते.

* २०० नोटांची छपाई कर्नाटकातील म्हैसूर आणि पं बंगालमधील सालबोनी येथील प्रिंटिंग प्रेसमध्येही छपाई सुरु असल्याचे समजते.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.