बुधवार, १९ जुलै, २०१७

रिलायन्स जियो जगातील सर्वात मोठं डेटा नेटवर्क - १९ जुलै २०१७

रिलायन्स जियो जगातील सर्वात मोठं डेटा नेटवर्क - १९ जुलै २०१७

* रिलायन्स जियो मोबाईल डेटा ट्रॅफिकमधील १५% भागीदारीसह जगातील सर्वात मोठं डेटा नेटवर्क असल्याचे रिलायन्स जियोचे अधिकारी सुनील दत्त यांनी सांगितले.

* जियोच्या लॉन्चिंगपूर्वी भारतात प्रत्येक महिन्याला ०.२ गिगाबाईट मोबाईल डेटा वापरला जायचा. मात्र जियोनंतर हा आकडा १.२ गिगाबाईट एवढा झाला आहे. यामध्ये १ गिगाबाईट जियोचे ग्राहकच वापरतात.

* जियोने ५ सप्टेंबर २०१६ रोजी मोफत डेटा, मोफत व्हॉइस कॉलिंग ऑफर, देत सेवा सुरु केली. त्यानंतर ग्राहकांनी जियोला पसंती देत १० कोटी ग्राहक जोडण्याचा विक्रमही केला.

* भारतात एकूण डेटा वापरात ८५% डेटा जियोचा वापरला जातो. म्हणजे एअरटेल, वोडाफोन, आयडिया या इतर कंपन्यांची यातील भागीदारी केवळ १५% आहे.

* रिलायन्स जियोचे ३ लाख ६० हजार ग्राहक दररोज व्हिडीओ कॉलिंग करतात. जगभरातील डेटा ट्रॅफिक मध्ये जियोचा सहभाग १५% आहे. हा आकडा भारताला जगभरातील टॉप टेनच्या यादीत आणतो.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.