शुक्रवार, १४ जुलै, २०१७

भारतीय रेल्वेने प्रथमच सौरऊर्जेवर चालणाऱ्या डिझेल ट्रेनचा वापर सुरु केला - १५ जुलै २०१७

भारतीय रेल्वेने प्रथमच सौरऊर्जेवर चालणाऱ्या डिझेल ट्रेनचा वापर सुरु केला - १५ जुलै २०१७

* शुक्रवारी दिल्लीच्या सफरगंज रेल्वे स्थानकात भारतीय रेल्वेने प्रथमच सौरऊर्जेवर चालणाऱ्या डिझेल ट्रेनचा वापर सुरु केला गेला आहे.

* दिल्लीच्या सराई रोहिला ते हरयाणाच्या फारुख नगर या मार्गावर ही ट्रेन धावेल ट्रेनच्या एकूण सहा डब्यावर सौर उर्जेचे १६ पॅनल बसवण्यात आले.

* जगात प्रथमच रेल्वेमध्ये सोलर पॅनलचा विद्युत ग्रीड म्हणून वापर करण्यात येणार आहे. या ट्रेनमध्ये पॉवर बॅकपची सुविधा आहे. तर ही ट्रेन ७२ तास बॅटरीवर चालू शकते.

* रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितले की पुढच्या ५ वर्षात रेल्वे १ हजार मेगावॅट सौर ऊर्जेची निर्मिती करेल अशी घोषणा त्यांनी केली.

* सौर ऊर्जेच्या वापरामुळे पुढील २५ वर्षात रेल्वेला ५.२५ लाख लिटर डिझेल वाचवता येईल याच काळात प्रत्येक ट्रेनवर ३ कोटी रुपये वाचतील. सूरू ऊर्जेमुळे २५ वर्षात १३५० टनांनी कार्बनडाय ऑक्सईड वाचेल. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.