सोमवार, १० जुलै, २०१७

राज्यातील रस्ते विकासासाठी केंद्राकडून मिळणार विक्रमी दीड ते दोन लाख कोटी निधी - ११ जुलै २०१७

राज्यातील रस्ते विकासासाठी केंद्राकडून मिळणार विक्रमी दीड ते दोन लाख कोटी निधी - ११ जुलै २०१७

* महाराष्ट्र राज्यावर असलेले कर्जमाफी आणि सातवा वेतन आयोग यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेवर ताण वाढला असल्याने राज्यातील बहुतांश रस्ते बांधणीचे काम केंद्रीय रस्ते विभागाने स्वतःकडे घेतले आहे.

* राज्यातील जवळपास ३३ हजार ७०५ किलोमीटरच्या राज्य महामार्गापैकी ४० टक्क्याहून अधिक रस्ते या वर्षी केंद्र सरकार बांधणार आहे.

* राज्याच्या रस्ते विकासासाठी १.५ ते २ लाख कोटी एवढा विक्रमी निधी मिळणार असून सध्या ४ हजार किलोमीटरचे रस्ते बांधणे सुरु झाले आहे.

* मॉन्सून संपल्यानंतर १५ हजार किलोमीटरच्या रस्ते कामासाठी निविदा मागविण्यात येणार आहेत. केंद्राने या कामासाठी दिलेला निधी खर्च कसा करावा याचे तपशीलवार नियोजन राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभाग सचिव आशिषकुमार सिंग करीत आहेत.

* मुख्यमंत्री आणि नितीन गडकरी यांनी एकत्रितपणे ही मोहीम हाती घेतली आहे. केंद्राचा निधी राज्याकडे वर्ग करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची [ MSRDC ] ची नेमणूक करण्यात आली आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.