शनिवार, १५ जुलै, २०१७

विशेष लेख [ भविष्यातील विद्युत वाहने ] - १५ जुलै २०१७

विशेष लेख [ भविष्यातील विद्युत वाहने ] - १५ जुलै २०१७

* जगभरात इंधनाचे स्रोत आटत चालले आहेत किंबहुना एक दिवस हे स्रोत समूळ नष्ट होतील. असे आपण नेहमीच ऐकत आलो आहो. परंतु ते एक दिवस खरेही ठरेल तर मग.

* नजीकच्या काळात इंधनावरील वाहनांना विजेवर चालणारी वाहने भक्कम पर्याय ठरू शकणार आहेत. त्याच गतीने आज जगाची वाटचाल सुरु आहे.

* आपल्या केंद्रीय ऊर्जामंत्री पियुष गोयलने तर सांगूनही टाकले आहे की, २०३० नंतर देशात पेट्रोल डिझेलवर चालणारे एकही वाहन विकू देणार नाही.

* इलेक्ट्रिक गाड्यांसाठी चार्जिंग पॉईंट्सची मोठ्या प्रमाणात गरज लागेल. तर जर एवढी विद्युत जर सरकारने तयार केली तर आपण २०३० पर्यंत पूर्ण करू शकते.

* ब्लूमबर्ग न्यू एनर्जी फायनान्स या संस्थेने अलीकडेच एक अहवाल जारी केला आहे. त्यात इलेक्ट्रिक वर चालणाऱ्या गाड्यांच्या किमती झपाट्याने उतरू लागल्याचे नमूद करण्यात आले आहे.

* याची २ प्रमुख कारणे म्हणजे इलेक्ट्रिक कारमध्ये अत्यंत महत्वाची भूमिका निभावणाऱ्या बॅटरीच्या कमी होऊ लागलेल्या किमती आणि चीन व युरोपने आक्रमकरीत्या राबवण्यास सुरुवात केलेली शुन्य उत्सर्जन मोहीम.

* २०२५ ते २०३० या काळात इंधनावर चालणाऱ्या गाड्यांच्या किमती आणि इलेक्ट्रिक वरच्या गाड्या एकाच
पातळीवर येतील किंबहुना त्या अधिक स्वस्त होतील. असे या अहवालात म्हटले आहे.

* सध्या टेस्ला आणि फोक्सवॅगन यांनी २०२५ पर्यंत दरवर्षी १० लाखाहून अधिक इलेक्ट्रिक कार तयार करण्याचा संकल्प सोडला आहे. गेल्याच आठवड्यात व्होल्वोनेही २०१९ पर्यंत इंधनावर चालणाऱ्या गाड्यांची निर्मिती बंद करून हायब्रीड आणि इलेक्ट्रिक कार तयार करण्याची घोषणा केली आहे.

* २०४० पर्यंत जगभरात तब्बल ५४% गाड्या इलेक्ट्रिक असतील असे या अहवालात अंदाज लावण्यात आला आहे. याला कारण म्हणजे बॅटऱ्यांच्या किमती कमी होत असून त्या २०१० च्या १९ हजाराहून २०३० साली ४ हजार ५०० रुपयांपर्यंत खाली येतील.

* कारण टेस्ला स्वतःच या बॅटरीची निर्मिती मोठया प्रमाणात करणार आहे. पुढील दशकभरात देशभरातील सरकारांना मात्र इलेक्ट्रिक कारचा वापर वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी लागणार आहे.

* बॅटरीचा आकार कमी करण्याचा टेस्लाचा मानस आहे. तसेच गाड्यांच्या निर्मितीला प्रोत्साहन करून लिथियम आयन बॅटरीच्या उपलब्दतेवर हे सारे अवलंबून राहील.

* इलेक्ट्रिक कारच्या किमती कमी होतील म्हणून ग्राहक त्याच्याकडे आकर्षित होतील.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.