शुक्रवार, १४ जुलै, २०१७

मुंबईच्या आकाराच्या ९ पट मोठा हिमखंड अंटार्टिकापासून तुटला - १५ जुलै २०१७

मुंबईच्या आकाराच्या ९ पट मोठा हिमखंड अंटार्टिकापासून तुटला - १५ जुलै २०१७

* सुमारे ५ हजार ८०० चौरस किलोमीटरचा हिमखंड १० ते १२ जुलैदरम्यान अंटार्टिकापासून तुटला त्यामुळे अंटार्टिकाचा नकाशाच बदलून गेला आहे.

* लार्सेन सी असे या संपूर्ण हिमखंडाचे नाव होते. हा हिमखंड अंटार्टिका पासून तुटत असल्याचे नासाच्या [ ऍक्वा मोडीस ] उपग्रहाने टिपलं होत.

* शास्त्रज्ञाच्या म्हणन्यासनुसार, समुद्र पातळीत १० सेमी वाढ होईल. शिवाय या द्वीपकल्पाच्या वाहतूक करणाऱ्या जहाजांच्या अडथळ्यात वाढ होईल.

* हा हिमखंड तुटण्यामागे कार्बन उत्सर्जन हे एक मोठे कारण आहे. कार्बन उत्सर्जन मुळे जागतिक तापमानामध्ये वाढ झाली आहे.

* भारताच्या दृष्टीने याचे तोटे असे की समुद्र पातळीत वाढ होईल परिणामी अंदमान आणि निकोबारच्या बंगाल खाडीच्या सुंदरबनचा काही भाग पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.