रविवार, ९ जुलै, २०१७

अहमदाबाद शहर जागतिक वारसा म्हणून घोषित - १० जुलै २०१७

अहमदाबाद शहर जागतिक वारसा म्हणून घोषित - १० जुलै २०१७

* अहमदाबाद शहराला जागतिक वारसा शहर म्ह्णून ओळख मिळाली असून याबाबत युनेस्कोने ट्विटरवरून घोषणा केली आहे. अशी ओळख मिळवणारे अहमदाबाद हे भारतातील पहिले शहर आहे.

[ अहमदाबादचा इतिहास ]

* अहमदाबाद चा शोध अहमद शहा याने लावला. हिंदू आणि जैन धर्मियांची रेखीव मंदिरे, मुस्लिम वास्तुशात्रकारांची उत्कृष्ट शिल्पे या शहरात आढळतात.

* १९१५ ते १९३० दरम्यान या शहरामध्ये महात्मा गांधी यांनी वास्तव्य केले होते. १९८४ मध्ये पहिल्यांदाच या शहराच्या ऐतिहासिक ठेव्यावर अभ्यास करण्यात आला.

* याचसोबत अहमदाबाद महापालिकेकडून हेरिटेज सेलची स्थापना करण्यात आली.

[ जागतिक वारस्याचा शहराचा प्रवास ]

* पोलंडमधील क्रॅक्रोव्ह येथे युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीची बैठक पार पडली. आणि या बैठकीत अहमदाबादला जागतिक वारसा घोषित करण्यात आला.

* सुमारे ६०० वर्षाचा इतिहास असणाऱ्या अहमदाबादचा आता पॅरिस, व्हिएन्ना, कैरो, ब्रुसेल्स, रोम, एडिनबर्ग आदी देशांच्या पंक्तीत समावेश झाला आहे.

* ऐतिहासिक शहरामध्ये स्थान मिळवण्यासाठी दिल्ली आणि मुंबई या शहरांची अहमदाबादला स्पर्धा होती ती या शहराने अखेर जिंकली.

* अहमदाबाद शहराला जागतिक वारसामध्ये ओळख मिळवण्यासाठी ३१ मार्च २०११ मध्ये विविध कागदपत्रांची जुळवणी करून युनेस्को कडे पाठविण्यात आली. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.