मंगळवार, ११ जुलै, २०१७

लोकसंख्या दिन विशेष लेख - ११ जुलै २०१७

लोकसंख्या दिन विशेष लेख - ११ जुलै २०१७

* ११ जुलै हा जागतिक लोकसंख्या दिन म्हणून सर्व जगात राबविला जातो. पण लोकसंख्या नियंत्रणात राहावी त्यासाठी काही उपाय करणे आवश्यक आहेत.

* लोकसंख्या आटोक्यात राहावी, यासाठी सरकार विविध मार्गानी प्रयत्न करत आहे. मंत्र सुखी संसाराचा दोन मुलामध्ये ३ वर्षे अंतराचा हे घोषवाक्य आरोग्य विभागाने बनवले आहे.

* लोकसंख्या नियंत्रण ठेवण्यासाठी नसबंदी शस्त्रक्रिया, गार्भनिरोधक गोळ्या, तांबी, निरोध [ कंडोम ], यासारखे पर्याय नागरिकांसमोर आहेत. परंतु प्रभावी ठरणाऱ्या नसबंदी शस्त्रक्रियेत महिलांचीच आघाडी दिसते.

* राज्य सरकारनुसार प्रत्येक जिल्ह्याला कुटुंबनियोजनाचे लक्ष्य ठरवून दिले जाते. त्यानुसार आरोग्य विभाग कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम राबवितो.

* नसबंदी शस्त्रक्रियेत समाजात अनेक गैरसमज आहेत. खरे तर महिलांपेक्षा पुरुषांची शस्त्रक्रिया कमी त्रासाची आणि सोपी असूनही पुरुष त्यासाठी तयार होत नाहीत.

* संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार भारतासारख्या विकसनशील देशातील प्रजोत्पादन ८६ कोटी ७ लाख दाम्पत्यांना आधुनिक कुटुंबनियोजन साधनांची गरज आहे.

* पण यापैकी ६४ कोटी ७ लाख दाम्पत्यांना ती साधने मिळतात. उर्वरित २२ कोटी २ लाख दाम्पत्यापर्यंत पोचू शकलेली नाहीत.

* भारतात बालविवाह हे प्रमुख कारण - विकसनशील देशात होणारे बालविवाह हे लोकसंख्या वाढीचे प्रमुख कारण आहे. वयाची २० -२१ वर्षे पूर्ण होताच मुलीस २ किंवा ३ मुले होतात.

* जगात बालविवाह होणाऱ्या २० देशांपैकी भारत एक आहे. बांगलादेशात ६६% तर भारतात ४६% बालविवाह होतात.

* भारतात शिक्षण गळती आणि लैंगिक व प्रजनन शिक्षणाची  माहितीच नसल्याने आरोग्य व कुटुंबनियोजन हक्काबाबत स्त्रियांमध्ये अज्ञानाचे प्रमाण अधिक आहे.

* जागतिक पातळीवर कुटुंबनियोजन साधनांचा वापर - स्त्री शस्त्रक्रिया ३०%, पुरुष शास्त्रकिया ४२%, गोळ्या १४%, इंजेक्शनचा वापर ६%, निरोध/कंडोम १२%, तांबी २३%, पारंपरिक ११%.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.