सोमवार, १० जुलै, २०१७

जर्मनीच्या हॅम्बुर्ग येथे जी - २० परिषदेचा समारोप - ११ जुलै २०१७

जर्मनीच्या हॅम्बुर्ग येथे जी - २० परिषदेचा समारोप - ११ जुलै २०१७

* जर्मनीमध्ये हॅम्बुर्ग येथे सुरु असलेल्या जी - २० शिखर परिषदेची ८ जुलै २०१७ रोजी सांगता झाली. ही परिषद [ शेपिंग अँड इंटरकनेक्टिंग वर्ल्ड ] या संकल्पनेवर आधारित आहे. 

* या परिषदेत विशेषतः जागतिकीकरणाचे लाभ सामायिक करणे, जागतिक लवचिकता, स्थिरता, आणि उत्तरदायित्व या चार महत्वाच्या विषयाविषयी व्यापक प्रश्नावर चर्चा करण्यात आली. 

* २० देशांच्या नेत्यांपैकी अमेरिका वगळता सर्व नेत्यांनी परिषदेच्या अंती जाहीर केलेल्या संयुक्त घोषणापत्रात हवामानसंबंधी सर्व मुद्यांशी सहमत होते. 

* पॅरिस हवामान करार आणि जीवाष्म इंधनाच्या बाबतीत अमेरिकेच्या दृष्टिकोनावर एक स्वतंत्र परिषद घोषणापत्रात समाविष्ट करण्यात आला. 

[ परिषदेतील महत्वाचे मुद्दे ]

* जी - २० नेत्यांनी जगभरातील दहशतवादी कारवाया तीव्र शब्दात निषेध केला. दहशतवाद आणि त्यांनी रसद पुरवणाऱ्याविरोधात एकजुट होण्याची सुविधा. 

* सर्व अयोग्य व्यापार पद्धतीसह सरंक्षणविरोधात लढा सुरु ठेवण्यास आणि या संदर्भात कायदेशीर व्यापार संरक्षण साधनांची भूमिका ओळखणे पुढेही चालू ठेवण्याचे वचन दिले. 

* २०२५ सालापर्यंत बालमजुरीचे निर्मूलन करण्यासाठी तसेच जबरदस्तीने मजुरी मानव तस्करी आणि आधुनिक गुलामगिरीचे सर्व प्रकार अशा समस्यांवर तात्काळ आणि प्रभावी उपाययोजना करण्याविषयी वचनबद्धता दर्शविली आहे. 

* जी - २० हा जगातल्या प्रमुख २० अर्थव्यवस्थांचा आणि त्यांच्या २० अर्थमंत्र्यांच्या तसेच केंद्रीय बँकांचे गव्हर्नर यांचा समूह आहे. 

* या समूहात भारतासह एकूण २० देशांचा समावेश असून या समूहाचे प्रतिनिधित्व युरोपीय परिषदेचे अध्यक्ष आणि युरोपीय केंद्रीय बँकद्वारा केले जाते. या समूहाची स्थापना १९९९ साली झाली. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.