शनिवार, १ जुलै, २०१७

MPSC कडून आधार क्रमांक बंधनकारक - २ जुलै २०१७

MPSC कडून आधार क्रमांक बंधनकारक - २ जुलै २०१७

* महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने [ एमपीएससी ] आयोगाच्या परीक्षा देण्यासाठी ऑनलाईन प्रोफाइलमध्ये आधार कार्ड अनिवार्य केले आहे.

* त्यामुळे परीक्षेसाठी उमेदवारांना प्रोफाइल तयार करताना आधार क्रमांकाचा आधार घ्यावा लागेल. ज्या उमेदवारांची  प्रोफाइल तयार आहे त्यांना आयोगाच्या नियमानुसार त्वरित सुधारणा करणे आवश्यक आहे.

* महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेकरिता उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातात.

* प्रोफाईलच्या माध्यमातून अतिरिक्त महत्वाची माहिती उमेदवारकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातात.

* निवड प्रक्रियेच्या टप्प्यावर उमेदवारांची ओळख पटण्यातही उमेदवारांच्या ऑनलाइन प्रोफाइलमध्ये त्यांनी त्यांचा आधार क्रमांक नमूद करणे बंधनकारक करण्याचा निर्णय आयोगाने घेतला.

* त्यामुळे ज्या उमेदवाराकडे आधार कार्ड नाही. त्यांनी त्वरित आधार कार्ड काढावे असे आव्हानही करण्यात आले आहे . असे आयोगाने म्हटले आहे.

* आधार कार्ड क्रमांक नसल्यास उमेदवारांना आयोगाच्या कार्यालयासमोर आपली ओळख निश्चित करून देणे बंधनकारक राहणार आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.