शनिवार, १ जुलै, २०१७

परदेशी नागरिकत्व स्विकारण्यात भारतीय नागरिक प्रथम - २ जुलै २०१७

परदेशी नागरिकत्व स्विकारण्यात भारतीय नागरिक प्रथम - २ जुलै २०१७

* आपला देश सोडून दुसऱ्या देशाचे नागरिकत्व स्वीकरणाऱ्या देशांच्या यादीत भारत सर्वात पुढे असल्याची माहिती [ इंटरनॅशनल मायग्रेशन आऊटलूक ] ने प्रसिद्ध केलेल्या अहवालात समोर आली आहे.

* २०१५ साली भारतातील जवळपास १.३० लाख नागरिकांनी OECD सदस्य असलेल्या देशांचे नागरिकत्व स्वीकारले आहे.

* यामध्ये कामानिमित्त व्हिसा काढून तिथेच स्थायिक झालेल्या लोकांची संख्या जास्त आहे. या अहवालात भारतानंतर मेक्सिको २ ऱ्या स्थानावर, तर फिलिपाइन्स ३ ऱ्या स्थानावर आहे.

* OECD म्हणजे - हा ३५ देशांचा समूह आहे. यामध्ये युरोपीय देश, अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, आणि जपान या देशांचा समावेश आहे.

* यातील अमेरिका, कॅनडा, इंग्लड, ऑस्ट्रेलिया, आणि जर्मनीमध्ये भारतीय प्रवासी राहण्यास पसंती देतात. असे यापूर्वीच अहवालात म्हटले आहे.

* परदेशात राहणाऱ्या भारतीयांची संख्या १ कोटी ५६ लाख असल्याचे या अहवालात म्हटले आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.