शनिवार, ८ जुलै, २०१७

भारत - ASEAN परिषद दिल्ली येथे संपन्न - ९ जुलै २०१७

भारत - ASEAN परिषद  दिल्ली येथे संपन्न - ९ जुलै २०१७

* ४ ते ५ जुलै २०१७ रोजी नवी दिल्लीत भारत ASEAN दिल्ली परिषद संपन्न झाली आहे. हे संवादाचे ९ वे सत्र होते.

* परिषदेचे आयोजन भारताच्या परराष्ट्र मंत्रालयामार्फत केले गेले. परिषदेत ASEAN इंडिया रिलेशन - चार्टीग द कोर्स फॉर द नेक्स्ट २५ इयर्स या विषयावर चर्चा करण्यात आली.

* दक्षिण आशियाई देशांची संघटना ASEAN सदस्य राष्ट्रे आणि भारत यांच्यातील संबंधांना सुदृढ करण्यासाठी २००९ सालापासून दरवर्षी दिल्ली संवाद आयोजित केले जाते.

* परिषदेत राजकीय सुरक्षा, आर्थिक आणि सामाजिक सांस्कृतिक भागीदारीसंबंधी चर्चा केली जाते.

* ASEAN ही दहा दक्षिणपूर्व राष्ट्रांची एक प्रादेशिक आंतरसरकारी संघटना आहे. याची स्थापना ८ ऑगस्ट १९६७ रोजी इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपाइन्स, सिंगापूर, थायलंड यांनी केली तर इतर सदस्य ब्रुनेई, कंबोडिया, लाओस, म्यानमार, व्हिएतनाम हे आहेत. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.