बुधवार, २८ जून, २०१७

विवोकडे IPL चे ५ वर्षापर्यंत टायटल स्पॉन्सरशिप - २९ जून २०१७

विवोकडे IPL चे ५ वर्षापर्यंत टायटल स्पॉन्सरशिप - २९ जून २०१७

* मोबाईल हँडसेट उत्पादन करणारा चिनी उद्योगसमूह विवोने आयपीएलचा मुख्य पुरस्कर्ता म्हणून हक्क राखण्यात यश मिळवले आहे. विवोकडे पुढील ५ वर्ष आयपीएलच टायटल स्पॉन्सरशिप असेल. 

* विवोने आयपीएलच्या २०१८ ते २०२२ या ५ वर्षासाठीचे हक्क राखण्यासाठी तब्बल २१९९ कोटी रुपयाची सर्वाधिक बोली लावली होती. 

* तर प्रतिस्पर्धी ओपो कंपनीने ४३० कोटी रुपयाच्या बोलीसह २ ऱ्या क्रमांकावर राहिली. २०१६ आणि २०१७ या २ वर्षासाठी आयपीएलच्या मुख्य पुरस्कर्त्याचे हक्क विवोकडेच राहतील. 

* त्यासाठी विवोने प्रत्येक वर्षाला १०० कोटी रुपये मोजले होते. आयपीएलचा मुख्य पुरस्कर्ता हे हक्क राखण्यासाठी विवोने गेल्या २ वर्षाच्या तुलनेत ५५४% आपली बोली वाढविली आहे. 

* बीसीसीआयने ३१ जुलै २०२२ पर्यंतच्या निविदा मागवल्या होत्या. विवो दरवर्षी बीसीसीआयला सुमारे ४४० कोटी रुपये देणार आहे. जी पहिल्या पेक्षा चारपट जास्त आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.