सोमवार, २६ जून, २०१७

कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली शैक्षणिक धोरण समितीची नेमणूक - २७ जून २०१७

कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली शैक्षणिक धोरण समितीची नेमणूक - २७ जून २०१७

* नव्या शैक्षणिक धोरणाची आखणी करण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने ज्येष्ठ शास्त्रज्ञ के कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली ९ सदस्यीय समितीची नेमणूक केली आहे.

* कस्तुरीरंगन यांनी भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे [इस्रोचे] संचालकपद भूषविले होते. माजी सनदी अधिकारी के के अल्फोन्स यांचादेखील या समितीत समावेश करण्यात आला आहे.

* कानमथानम यांच्याचप्रयत्नामुळे केरळमधील कोट्टायम आणि एर्नाकुलम जिल्ह्यामध्ये १००% साक्षरता झाली होती.

* तसेच या समितीत मध्यप्रदेशातील बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे कुलगुरु रामशंकर कुरील, कर्नाटक राज्य शोध परिषदेचे माजी सचिव डॉ एम. के. श्रीधर, भाषा कौशल्य क्षेत्रातील तज्ञ डॉ टी. व्ही. कट्टीमनी यांचा देखील समावेश आहे.

* तसेच गुवाहाटी विद्यापीठात पर्शियन भाषेचे प्राध्यापक असलेले डॉ मझहर असिफ, उत्तर प्रदेश शिक्षण मंडळाचे माजी संचालक कृष्णमोहन त्रिपाठी, ज्येष्ठ गणितज्ञ मंजुळ भार्गव, एसएनडीटी चे कुलगुरू वसुधा कामत यांचा देखील या समितीत समावेश करण्यात आला आहे.

* शिक्षणातील विविध क्षेत्रातील तज्ञ असल्यामुळे तसेच विविध राज्यातील असल्यामुळे विविधताही जपली गेली आहे. शिवाय या तज्ञ व्यक्तींचा वेगवेगळा अनुभव आणि धडाडी संगम या समितीत झाला आहे.

* या विविधतेमुळेच शैक्षणिक धोरण आखताना विविध दृष्टिकोनावर चर्चा होऊन शिक्षण क्षेत्रामध्ये सुधारणा होण्यास मदत होईल. असे सरकारला वाटते आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.