शनिवार, १० जून, २०१७

फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेचे महिला एकेरीचे विजेतेपद ओस्टपेनकोकडे - ११ जून २०१७

फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेचे महिला एकेरीचे विजेतेपद ओस्टपेनकोकडे - ११ जून २०१७

* लॅटव्हियाच्या २० वर्षीय जेलेना ओस्टपेनको हिने फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत शनिवारी एकेरीचे विजेतेपद मिळवले आहे.

* अंतिम फेरीच्या लढतीत तिने संभाव्य विजेतेपदासाठी पसंती मिळालेल्या रुमानियाच्या तृतीय मानांकित सिमोना हालेप हिचा ४-६, ६-४, ६-३ असा पराभव केला.

* २० वर्षीय जेलेना ओस्टपेनको फ्रेंच ओपन ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकणारी लॅटव्हियाची पहिली खेळाडू ठरली. तसेच फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकणारी २० वर्षीय जेलेना ओस्टपेनको ही १९३३ नंतरची पहिली बिगरमानांकीत खेळाडू ठरली.

* जागतिक क्रमवारीत ४७ व्या स्थानावर असलेली येलेना गेल्या २० वर्षांमधली फ्रेंच ओपनची सर्वात तरुण विजेतीही ठरली.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.