रविवार, २५ जून, २०१७

भारताच्या अंकुश दहियाला बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक - २६ जून २०१७

भारताच्या अंकुश दहियाला बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक - २६ जून २०१७

* अंकुश दहियाने उलानबातर कप बॉक्सिंग स्पर्धेत भारताचे एकमेव सुवर्णपदक जिंकले. अनुभवी देवेंद्रो सिंगला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

* भारताने या स्पर्धेत तीन ब्राँझसह ५ पदके जिंकली. मंगोलियातील या स्पर्धेत अंकुशने ६० किलो वजनी गटाच्या निर्णायक लढतीत कोरियाच्या मान चोए चॉल यांचा पराभव केला.

* तर देवेंद्रो ५२ किलो गटाच्या सुवर्णपदकाच्या लढतीत इंडोनेशिया एडोम्स सुगुरो यांच्याविरुद्ध पराजित झाला. के शाम कुमार ४९ किलो, महंमद हुस्मामुद्दीन ५६ किलो गटात, प्रियांका चौधरी ६० किलो गटात, पराजित झाले.

* मात्र माजी आशियाई युवा रौप्यपदक विजेता अंकुशने प्रथमच वरिष्ठ स्तरावर बाजी मारली. व १९  वर्षीय या नवोदित बॉक्सरने जास्त उंचीचा भरपूर फायदा घेतला. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.