शुक्रवार, २ जून, २०१७

पॅरिस हवामान करारातून अमेरिकेची माघार - ३ जून २०१७

पॅरिस हवामान करारातून अमेरिकेची माघार - ३ जून २०१७

* पॅरिस हवामान करारातून बाहेर पडण्याची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डॉनाल्ट ट्रॅम्प यांनी केली आहे. त्यांच्या मते हा करार भारत आणि चीनलाच फायद्याचा आहे. २०१५ मध्ये हा करार करण्यात आला होता.

[ पॅरिस करार व स्वरूप ]

* या कराराला पॅरिस क्लायमेट अग्रीमेंट, पॅरिस अग्रीमेंट अशा नावानी संबोधले जाते.

* औद्योगिक क्रांतीच्या आधीच्या काळापेक्षा तापमानात २ अंश सेल्सियस वाढ होऊ न देण्यास सदस्य देशांनी बांधिलकी व्यक्त करणे, हा त्यांचा उद्देश आहे.

* या करारानुसार, हरितगृह वायूच्या उत्सर्जनाबाबत प्रत्येक सदस्य देशांची राष्ट्रीय यंत्रणा त्यांच्या नियंत्रणाखाली असेल.

* जगातील ५५% जागतिक उत्सर्जनात वाटा असलेल्या ५५ देशांच्या प्रतिनिधींच्या ३० दिवसांच्या चर्चेनंतर चार नोव्हेंबर २०१६ रोजी हा करार कार्यंवित झाला.

* कराराबतच्या वाटाघाटीत १९५ देशांनी सहभागी होऊन करारावर सह्या केल्या होत्या. त्यातील १४७ देशांनी मे २०१७ पर्यंत त्याच्या पुढील कार्यवाहीला अनुकूलता दशविली होती.

* विकसनशील देशासमोर परंपरागत इंधनाकडून [ फॉसिक फ्युएल ] अपारंपरिक इंधनाकडे वळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.

* त्यांना आर्थिक आणि तांत्रिक मदतीची गरज आहे. त्याकरता दरवर्षी १०० अब्ज डॉलर याप्रमाणे २०२० पर्यंत मदतीचे आश्वसन पुढारलेल्या दिले आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.