गुरुवार, २२ जून, २०१७

जम्मू काश्मीर वगळता जिएसटी कायदा सर्व राज्यात मंजूर - २३ जून २०१७

जम्मू काश्मीर वगळता जिएसटी कायदा सर्व राज्यात मंजूर - २३ जून २०१७

* जम्मू काश्मीर वगळता सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांनी जीएसटी विधेयकाला मंजुरी दिली आहे. या राज्यामध्ये ३० जूनच्या मध्यरात्रीपासून वस्तू व सेवा कराची अमंलबजावणी सुरु करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

* केरळ आणि पश्चिम बंगालने वटहुकूम जारी केला आहे. तर उर्वरित राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांनी आपल्या विधानसभामध्ये जीएसटीला मंजुरी दिली आहे.

* अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की जीएसटी मंजुरीसाठी आता जम्मू काश्मीर हे एकच राज्य शिल्लक राहिले आहे. त्यामुळे सर्व ३० राज्ये व केंद्रशासित प्रदेशात १ जुलैपासून जीएसटी लागू होणार आहे.

* ३० जून रोजी जीएसटीच्या निमित्ताने संसदेच्या ऐतिहासिक सेंट्रल हॉलमध्ये १ तासाचा विशेष कार्यक्रम ठेवला आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.