शनिवार, २४ जून, २०१७

युपीएससीतर्फे २०१८ मध्ये होणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर - २५ जून २०१७

युपीएससीतर्फे २०१८ मध्ये होणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर - २५ जून २०१७

* केंद्रीय लोकसेवा अयोग अर्थात UPSC कडून २०१८ मध्ये घेण्यात येणाऱ्या विविध पदांच्या स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे.

* विविध विभागांतील पदांच्या परीक्षेची संभाव्य तारिख व अन्य तपशील या वेळापत्रकात नमूद केले आहे. वेळापत्रकात दर वर्षीप्रमाणे यंदाही राष्ट्रीय सुरक्षा प्रबोधिनी [NDA] प्रवेशासाठी वर्षातून २ परीक्षा नियोजित आहेत.

* वेळापत्रकात परीक्षेसंदर्भात सूचना कधी जाहीर केली जाईल. यासंबंधीची दिनांक, पूर्व परीक्षेची व मुख्य परीक्षेच्या तारखा, याबाबत सविस्तर तपशील जाहीर केला आहे.

* २०१८ चे वेळापत्रक UPSC च्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी त्या दृष्टीने अभ्यासाचे नियोजन करावे असे आयोगाने म्हटले आहे.

* आयोगाची वेबसाईट - www.upsc.gov.in 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.