गुरुवार, २२ जून, २०१७

भारत लोकसंख्येच्य बाबतीत २०२४ पर्यंत चीनला मागे टाकण्याचा अंदाज - २३ जून २०१७

भारत लोकसंख्येच्य बाबतीत २०२४ पर्यंत चीनला मागे टाकण्याचा अंदाज - २३ जून २०१७

* भारत २०२४ च्या आसपास चीनला लोकसंख्येच्या बाबतीत मागे टाकेल, अशी शक्यता संयुक्त राष्ट्राने अहवालातून आकडेवारीसह व्यक्त केली.

* संयुक्त राष्ट्रसंघाकडून प्रसिद्ध करण्यात आलेला लोकसंख्येबद्दलचा अंदाजाचा हा २५ वा अहवाल आहे. यामध्ये भारत २०२२ मध्येच चीनला मागे टाकू शकतो. असा अंदाज आहे.

* २०२४ मध्ये भारत आणि चीनची लोकसंख्या प्रत्येकी १४४ कोटी इतकी असेल. यानंतर २०३० मध्ये भारताची लोकसंख्या १५० कोटीवर जाऊन पोहोचेल.

* २०५० सालापर्यंत भारताची लोकसंख्या १६६ कोटीवर जाऊन पोहोचेल तर चीनची लोकसंख्या २०३० पर्यंत स्थिर होईल.

* भारताच्या लोकसंख्या वाढण्याचे प्रमाण २०५० नंतर कमी होईल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

* सध्या चीनची लोकसंख्या १४१ कोटी आहे. तर भारताची लोकसंख्या १३४ कोटी आहे. जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी १९% लोक चीनमध्ये आणि १८% लोक भारतात राहतात.

* हा अहवाल संयुक्त राष्ट्राच्या आर्थिक व सामाजिक विषयक विभागाने २०१७ मधील लोकसंख्येची समीक्षा करून अहवाल तयार केला आहे.

* अहवालानुसार जगातील १० देशांची लोकसंख्या २०१७-२०५० दरम्यान मोठ्या प्रमाणात वाढेल. आणि या जगाच्या लोकसंखेच्या निम्मी लोकसंख्या याच १० देशामध्ये वास्तव्यास येईल.

* या १० देशात भारत, नायजेरिया, कांगो, पाकिस्तान, इथोयोपिया, टांझानिया, अमेरिका, युगांडा, इजिप्त, इंडोनेशिया या देशांचा समावेश आहे.

* नायजेरिया देश लवकरच अमेरिकेच्या लोकसंख्येच्या बाबतीत मागे टाकण्याची शक्यता आहे. व २०५० मध्ये नायजेरिया जगातील ३ ऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक लोकसंख्येचा देश होईल. असे अहवालात सांगितले आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.