शुक्रवार, ३० जून, २०१७

आजपासून भारतात जीएसटी हा नवीन कर कायदा लागू - १ जुलै २०१७

आजपासून भारतात जीएसटी हा नवीन कर कायदा लागू - १ जुलै २०१७

* एक देश एक कर असलेल्या वस्तू आणि सेवा कर म्हणजेच जीएसटी करप्रणाली भारतात १ जुलै २०१७ पासून लागू झाली आहे. भारताच्या स्वातंत्र्यानंतरची ही सर्वात मोठी करप्रणाली आहे.

* भारतात जवळपास १७ वर्षानंतर जीएसटी ही करप्रणाली अमलात आणली जात आहे. जगभरातील आतापर्यंत अनेक देशामध्ये ही करप्रणाली लागू करण्यात आली आहे.

* फ्रांस या देशात सर्वात पहिल्यांदा जीएसटी करप्रणाली लागू करण्यात आली. मलेशिया. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, कॅनडा, या सारख्या देशातही ही करप्रणाली लागू करण्यात आली आहे.

* भारतातही ३० जूनच्या मध्यरात्रीपासून नवीन जीएसटी करप्रणाली लागू करण्यात आली आहे. या कारप्रणालीमुळे सेंट्रल सेल्स टॅक्स, एकसाईज टॅक्स अशाप्रकारचे सर्व टॅक्स रचना इतिहासजमा होणार आहे.

* जीएसटी ही आतापर्यंतची सर्वात मोठी आर्थिक सुधारणा ठरणार आहे. यामुळे करचुकवेगिरीला आळा बसणार असून सर्वसामान्याना यामुळे कोणताही त्रास होणार नाही त्यांचा फक्त फायदाच होणार आहे.

[ जीएसटी कररचना ]

* जीएसटी लागू झाल्यावर म्हणजेच आजपासून फक्त ३ प्रकारचे टॅक्सेस करदात्यांना भरावे लागणार आहेत.

* एक - सेंट्रल जिएसटी हा कर केंद्र सरकार वसूल करेल.

* दोन - स्टेट जिएसटी हा कर राज्य सरकारे त्यांच्या राज्यातील करदात्याकडून वसूल करतील.

* इंटिग्रेटेड [एकत्रित] जीएसटी दोन राज्यातील व्यापारावर हा कर लागू होईल. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.