शनिवार, १७ जून, २०१७

जगातील न्यूयॉर्क शहरात राहतात सर्वात जास्त गार्भश्रीमंत व्यक्ती - १८ जून २०१७

जगातील न्यूयॉर्क शहरात राहतात सर्वात जास्त गार्भश्रीमंत व्यक्ती  - १८ जून २०१७

* गरीब आणि श्रीमंत यातील दरी कधीही न भरून निघणारीच आहे. अनेक देशात असे धनाड्य आहेत की त्यांच्याकडील संपत्तीने ते गरीब देश अधिक सहज विकत घेऊ शकतात.

* काही दिवसापूर्वी एक अहवाल प्रकाशित झाला होता यात जगातील अशा व्यक्तींची नावे दिली होती की ज्यांच्या कंपन्यांचे उत्पन्न हे काही देशांच्या एकूण उत्पन्नाहुन अधिक होते.

* जानेवारी महिन्यात ऑक्सफम ने एक अहवाल प्रकाशित केला होता. ज्यात जगातील अर्ध्याहुन अधिक संपत्ती ही फक्त ८ व्यक्तींच्या हाती एकवटली आहे.

* तर नुकतीच फोर्ब्झने जगातल्या एकूण २ हजार ८३ गर्भश्रीमंतांची यादी तयार केली आहे. सहा खंडातल्या ७१ देशांमधल्या गर्भश्रीमंतांची यादी आहे. हे श्रीमंत जगात कोणत्या शहरात राहतात याची माहिती या अहवालात दिली आहे.

१] न्यूयॉर्क - जगातील सर्वात धनाढ्य व्यक्ती हे अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात राहतात. अहवालानुसार या शहरात एकूण ८२ गर्भश्रीमंत राहतात.

२] हॉंगकॉंग - या शहराचा यात २ रा क्रमांक लागतो. या शहरात एकूण ७५ गार्भश्रीमंत राहतात. जगातील महागड्या शहरामध्ये हॉंगकॉंगचा समावेश आहे.

३] मॉस्को - यात तिसरा क्रमांक आहे रशियाची राजधानी मॉस्कोचा. या देशात स्टील, तेल, कोळसा, नैसर्गिक वायू यासारखे वेगवेगळे उद्योग भरभराटीस आले आहे. यात ७३ अब्जाधीश राहतात.

४] बीजिंग - या शहराचा क्रमांक आहे चौथा. चीनची राजधानी असलेल्या या शहरात एकूण गर्भश्रीमंतांची संख्या आहे ५४. चीनच्या रिअल इस्टेस्ट क्षेत्रात नावाजलेले वॉन जिनलीन हे या शहरातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहे.

५] मुंबई - भारताची आर्थिक राजधानी असलेल्या स्वप्ननगरीत भारतातील सर्वात श्रीमंत राहतात. या शहरात एकूण ४१ गार्भश्रीमंत राहतात. या शहरातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा मान मुकेश अंबानीकडे आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.