सोमवार, १९ जून, २०१७

वैज्ञानिक ग्रॅहम फारकवर यांना २०१७ चा क्योटो पुरस्कार जाहीर - १९ जून २०१७

वैज्ञानिक ग्रॅहम फारकवर यांना २०१७ चा क्योटो पुरस्कार जाहीर - १९ जून २०१७

*  वैज्ञानिक ग्रॅहम फारकवर यांना २०१७ चा क्योटो पुरस्कार जाहीर झाला आहे. जपानच्या इनामोरी फाउंडेशनचा हा नोबेलच्या तोडीचा पुरस्कार मिळवणारे ते पहिले ऑस्ट्रेलियन वैज्ञानिक आहेत.

* त्यांचे संशोधन हे दुष्काळी भागात टिकू शकतील, अशा पिकांच्या प्रजाती व वनस्पतीमधील पाण्याच्या बाष्पीभवनाचा हवामान बदलावर परिणाम याच्याशी संबंधित आहे.

* साधारणपणे विज्ञानातील ज्या क्षेत्रात नोबेल जात नाही त्या क्षेत्रात हा पुरस्कार दिला जातो. तो ६ लाख डॉलरचा असतो.

* त्यांच्या जैवभौतिक प्रारुपामुळे वनस्पतीपासून सगळ्या जंगलापर्यंत जैविक व्यवहार कसे चालतात याचा उलगडा झाला.

* त्यांनी या अभ्यासाच्या आधारे वनस्पतीचे कार्य कसे चालते याची गणितीय प्रारूपे आज जगातील कृषी व पर्यावरण वैज्ञानिक वापरतात.

* पृथ्वीवरील जीवनाचा मूलाधार असलेल्या प्रकाशसंश्लेषणाचे आपले जे ज्ञान आहे त्यात त्यांनी मोलाची भर टाकली. त्यांना याआधी प्रतिष्ठेचा रँक पुरस्कार जाहीर झाला.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.