मंगळवार, १३ जून, २०१७

देशातील प्रत्येक जिल्ह्यात पासपोर्ट कार्यालय - १३ जून २०१७

देशातील प्रत्येक जिल्ह्यात पासपोर्ट कार्यालय - १३ जून २०१७

* केंद्र सरकारने पासपोर्ट सेवेसंबंधी मोठा निर्णय घेतला आहे. आता देशातील प्रत्येक जिल्ह्यात पासपोर्ट मिळणार आहे.

* यासाठी देशभरातील ८०० जिल्ह्यातील मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये पासपोर्ट कार्यालय सुरु करण्यात येणार आहे. अशी माहिती परराष्ट्र मंत्री व्ही के सिंग यांनी दिली.

* यावर्षी १५० पोस्ट ऑफिस कार्यालयात पासपोर्ट सेवा केंद्र सुरु करण्यात आले आहे. पुढील २ वर्षात सर्व देशातील ८०० जिल्ह्यात पासपोर्ट सेवा केंद्र सुरु करण्यात येतील.

* गाव खेड्यातील नागरिकांना पासपोर्टसाठी मोठ्या शहरात चकरा ,मारणं जिकिरीचं जात त्यामुळेच केंद्र सरकारने अशा नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला.

* परराष्ट्र मंत्रालय आणि पोस्ट विभाग संयुक्तपणे हे पाऊल उचललं आहे. पासपोर्ट बनल्यानंतर ते घरपोच पोहोचवण्याचं काम पोस्ट ऑफिस करणार आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.