सोमवार, १९ जून, २०१७

रामनाथ कोविंद हे भाजपप्रणीत एनडीएचे राष्ट्रपतिपदाचे उमेदवार जाहीर - २० जून २०१७

रामनाथ कोविंद हे भाजपप्रणीत एनडीएचे राष्ट्रपतिपदाचे उमेदवार जाहीर - २० जून २०१७

* बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद हे भाजपप्रणीत एनडीएचे राष्ट्रपतिपदाचे उमेदवार जाहीर करण्यात आले असून भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी काळ पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती दिली.

* रामनाथ कोविंद हे दलित नेते म्हणून परिचित असून. त्यांचे सामाजिक कार्य मोठं आहे. त्यामुळे त्यांच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीवर एनडीएचे एकमत झाल्याचं अमित शहा यांनी म्हटले.

* सध्या बिहारचे राज्यपाल असलेले रामनाथ कोविंद हे उत्तर प्रदेशमधील कानपूरचे रहिवासी आहेत.

[ रामनाथ कोविंद यांचा परिचय ]

* रामनाथ कोविंद यांचा जन्म १ ऑकटोबर १९४५ साली उत्तरप्रदेशच्या कानपुर जिल्ह्यातील परौख या गावी झाला.

* कानपुर विद्यापिठातून त्यांनी LLB चे शिक्षण घेतले.

* १९७७ ते १९७९ मध्ये दिल्ली हायकोर्टात वकिली म्हणून कार्य.

* १९९४ आणि २००० साली उत्तर प्रदेशमधून राज्यसभेवर नियुक्ती.

* भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून त्यांनी काम पहिले.

* १९९८ ते २००० या काळात त्यांनी भाजप दलित मोर्चाचे अध्यक्षपद सांभाळले.

* १९९४ ते २००० आणि २००० ते २००६ अशी १२ वर्षे ते राज्यसभेचे सदस्य राहिले.

* ८ ऑगष्ट २०१५ रोजी राष्ट्रपतींनी बिहारचे राज्यपाल म्हणून त्यांची नियुक्ती केली होती.

[ जीवन परिचय ]

* रामनाथ कोविंद यांचा जन्म कानपूरमधील डेरापुर तालुक्यातील परौख गावात झाला. त्यांनी सर्वोच्च न्यायालयात वकिली केली.

* १९७७ मध्ये जनता पार्टीच सरकार आल, त्यामध्ये ते पंतप्रधान मोरारजी देसाई यांचे स्वीय सचिव होते. त्याचवेळी ते भाजप नेतृत्वाच्या संपर्कात होते.

* रामनाथ कोविंद  यांनी १९९० मध्ये भाजपच्या तिकिटावर घाटमपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांचा पराभव झाला.

* पण पक्षाने त्यांना १९९३ आणि १९९९ मध्ये उत्तर प्रदेशातून २ वेळा राज्यसभेवर पाठवलं होत.

* कोविंद यांचे प्राथमिक शिक्षण खानपूर जिल्हा परिषदेत झाले. त्यांनी डीएव्ही कॉलेजमधून बी कॉम आणि कायद्याची पदवी घेतली.

* यानंतर त्यांनी दिल्लीत राहून युपीएससीची तयारी केली. आणि ३ ऱ्या प्रयत्नात त्यांनी यश मिळवले. मात्र मुख्य प्रवाहातील नोकरी न मिळाल्याने त्यांनी नोकरी नाकारली.

* कोविंद यांना ३ भाऊ आहेत. ते सर्वात लहान. त्यांच्या परौख गावात वडिलांकडून वारसा हक्काने मिळालेलं घर त्यांनी सामाजिक कार्यासाठी दान केले.

[ राष्ट्रपती निवडणूक प्रक्रिया ]

* राष्ट्रपती निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली आहे. आतापर्यंत १५ उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे. अर्ज करण्याची अखेरची तारीख २८ जून आहे.

* तर १ जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. यानंतर १७ जुलैला मतदान व २० जुलैला निकाल जाहीर होऊन नवनिर्वाचित राष्ट्रपती २५ जुलैला पदभार स्वीकारतील.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.