गुरुवार, २२ जून, २०१७

मुंबईतील ताज महाल हॉटेलला ट्रेडमार्कचा दर्जा प्रदान - २३ जून २०१७

मुंबईतील ताज महाल हॉटेलला ट्रेडमार्कचा दर्जा प्रदान - २३ जून २०१७

* मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियाजवळच्या [ ताज महाल पॅलेस ] हॉटेलच्या इमारतीला ट्रेडमार्कचा दर्जा मिळाला आहे. ११४ वर्ष जुनी असलेली ताजमहाल पॅलेस हॉटेलची बिल्डिंग ट्रेडमार्क लाभलेली भारतातील ती एकमेव वास्तू आहे.

* न्यूयॉर्कची एम्पायर स्टेट बिल्डिंग, पॅरिसचा आयफेल टॉवर, सिडनीचे ऑपेरा हाऊस, या ट्रेडमार्क असलेल्या वास्तूच्या पंगतीत आता मुंबईतला ताज महाल हॉटेलही जाऊन बसला आहे.

* एखाद्या ब्रॅण्डचा लोगो, एखादी विशिष्ट रंगसंगती, सांख्यिकी अशा गोष्टींचे बऱ्याचदा ट्रेडमार्क होत असते. भारतात ट्रेडमार्क ऍक्ट १९९९ पासून लागू करण्यात आला.

* हा कायदा अमलात आल्यापासून पहिल्यांदाच एखादया बिल्डिंगला ट्रेडमार्क देण्यात आला. गेट वे ऑफ इंडिया या ठिकाणी १९०३ साली ताज महाल या हॉटेलची निर्मिती करण्यात आली.

* प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक शापूरजी पालनजी यांच्या कंपनीने ही ताज महाल हॉटेलची बिल्डिंग बांधली आहे. ट्रेडमार्कचा दर्जा मिळाल्यामुळे आता या हॉटेलच्या छायाचित्राचा व्यवसायिक फायद्यासाठी जाहिरातीसाठी वापर करता येणार नाही.

* असे ट्रेडमार्क मिळवणारी भारतातील ही पहिली इमारत बनली आहे.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.