रविवार, २५ जून, २०१७

रोडा मेहता एआयतर्फे जीवनगौरव पुरस्कार प्रदान - २६ जून २०१७

रोडा मेहता यांना  एआयतर्फे जीवनगौरव पुरस्कार प्रदान - २६ जून २०१७

* अड्वर्टायझिंग एजन्सीज ऑफ इंडिया कडून [एआय] जाहिरात क्षेत्रात महत्वपूर्ण योगदानाबद्दल दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार रोडा मेहता यांना जाहीर झाला आहे.

* रोडा मेहता यांनी जाहिरात क्षेत्रामध्ये शास्त्रीय पद्धतीने माध्यम नियोजन आणि विक्री यांची सुरुवात पहिल्यांदाच केली. जाहिरात क्षेत्रात नव्या व्यावसायिकांची एक फळी त्यांनी तयार केली.

* त्या [हिंदुस्थान थॉम्पसन] मध्ये १९७१ मध्ये रुजू होणाऱ्या रोडा मेहता या क्षेत्रातील माध्यम विभागातील व्यवस्थापन शाखेच्या पहिल्या महिला पदवीधर ठरल्या होत्या.

* उद्योग क्षेत्रातील अनेक संघटनांवर त्यांनी काम केले आहे. दूरदर्शन आणि आकाशवाणीच्या समित्यांमध्ये त्यांचा समावेश करण्यात आला आहे.

* केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या सल्लागार मंडळात त्यांचा समावेश आहे. मार्केट रिसर्च सोसायटी ऑफ इंडिया च्या त्या संस्थापक सदस्य आहेत.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.