रविवार, २५ जून, २०१७

किदाम्बी श्रीकांतला ऑस्ट्रेलियन ओपन सुपर सीरिजचे बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद - २६ जून २०१७

किदाम्बी श्रीकांतला ऑस्ट्रेलियन ओपन सुपर सीरिजचे बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद - २६ जून २०१७

* भारताचा स्टार शटलर किदाम्बी श्रीकांतने ऐतिहासिक विजयाची नोंद करत रविवारी अंतिम सामन्यात ऑलिम्पिक आणि वर्ल्ड चॅम्पियन चीनच्या चेन लॉन्गचा पराभव करत ऑस्ट्रेलियन ओपन सुपर सीरिजचे बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

* गेल्या आठवड्यात श्रीकांतने इंडोनेशिया ओपन सुपर सीरिजचे जेतेपद पटकावले होते. तसेच याआधी त्याला सिंगापूर ओपन स्पर्धेत त्याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.

* त्याने दमदार खेळाचे प्रदर्शन करताना २२-२०, २०-१६ अशी बाजी मारत जेतेपदाला गवसणी घातली.

[ श्रीकांत किदाम्बीचे विक्रम ]

* सलग तीन सुपर सिरीज अंतिम सामना खेळणारा श्रीकांत जगातील केवळ ६ वा शटलर खेळाडू ठरला आहे.

* चार सुपर सिरीज जिंकलेला श्रीकांत पहिला पुरुष भारतीय शटलर ठरला. त्याने २०१४ मध्ये चायना ओपन, २०१५ मध्ये इंडिया ओपन, २०१७ जून मध्ये इंडोनेशिया, तर आता ऑस्ट्रेलिया ओपन अशा स्पर्धा जिंकल्या.

* ऑस्ट्रेलियय ओपन सीरिजचे पदक जिंकणारा श्रीकांत हा पहिला भारतीय पुरुष खेळाडू ठरला आहे. याआधी महिलांमध्ये सायना नेहवाल २ वेळा ही स्पर्धा जिंकली आहे.

* श्रीकांतला भारतीय बॅडमिंटन संघटनेने ५ लाख रुप्याचे रोख बक्षीस तर उद्योगपती आनंद महिंद्रा यांच्या तर्फे महिंद्रा कार बक्षीस म्हणून जाहीर केले आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.