मंगळवार, १३ जून, २०१७

महाराष्ट्रात सातवा वेतन आयोग लागू करण्याची तयारी सुरु - १४ जून २०१७

महाराष्ट्रात सातवा वेतन आयोग लागू करण्याची तयारी सुरु - १४ जून २०१७

* राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मोठा आर्थिक बोजा राज्य सरकारवर पडणार असला तरी, शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना ७ वा वेतन आयोग लागू करण्याची तयारीही सुरु केली आहे. 

* या आयोगाच्या संदर्भात नेमण्यात आलेल्या के. पी. बक्षी समितीचा अहवाल डिसेंबरपर्यंत शासनाला सादर होईल.

* केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी १ जानेवारी २०१६ पासून ७ वा वेतन आयोग लागू केला आहे. राज्य कर्मचाऱ्यांसाठी त्याच तारखेपासून आयोगाच्या शिफारसी लागू कराव्या. अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे.

* सातवा वेतन आयोग लागू करायचा झाल्यास १८ ते २० हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.