शनिवार, २४ जून, २०१७

भारतातील पहिली अंडरवॉटर मेट्रो टनेल कोलकात्यात - २५ जून २०१७

भारतातील पहिली अंडरवॉटर मेट्रो टनेल कोलकात्यात - २५ जून २०१७

* कोलकात्यामधील हुगळी नदीखालील बोगद्याचे काम पूर्ण झाले असून लवकरच या मार्गावरून मेट्रो धावताना दिसणार आहे. देशातील अशा प्रकारचा हा पहिला प्रकल्प आहे.

* कोलकाता मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने या मार्गाचे बांधकाम केले आहे. या कामगिरीसोबत भारत काही ठराविक देशांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे.

* १९८४ मध्ये देशातील पहिली मेट्रो धावल्यावर कोलकाताने मिळवलेले हे दुसरे महत्वाचे यश आहे.

* कोलकाता मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या टीमने ज्यामध्ये परदेशातील अभियंत्यांचादेखील समावेश आहे. त्यांनी अंडरवॉटर टनेलचे काम पूर्ण केले आहे. अशी माहिती मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे संचालक सतीश कुमार यांनी दिली.

* कोलकाता ही मेट्रो धावताना दिसणार आहे. या बोगद्याच्या माध्यमातून हावडा आणि कोलकाताला मेट्रोच्या माध्यमातून जोडण्यात येणार आहे. या मार्गावर नदीखालून धावणारी मेट्रो पाहायला मिळणार आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.