शुक्रवार, ३० जून, २०१७

भारतीय युवासंघाच्या प्रशिक्षकपदी राहुल द्रविड - १ जुलै २०१७

भारतीय युवासंघाच्या प्रशिक्षकपदी राहुल द्रविड - १ जुलै २०१७

* भारताच्या अ आणि १९ वर्षाखालील क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी राहुल द्रविड यांनाच कायम ठेवण्यात आल्याची घोषणा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने शुक्रवारी केली. त्यांची नियुक्ती २ वर्षासाठी असेल.

* यापूर्वी २०१५ मध्ये द्रविड यांची या दोन्ही संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या कारकिर्दीत भारतीय संघानी मायदेशसह परदेशातही चांगले यश मिळवले आहे.

* त्यांच्या नेतृत्वात भारतीय अ संघाने ऑस्ट्रेलियातील तिरंगी मालिका जिंकली. १९ वर्षाखालील युवा संघाने विश्वकरंडक स्पर्धेची अंतिम फेरी गाठली परंतु विंडीजविरुद्ध त्यांना पराभव पत्करावा लागला.

* बीसीसीआय चे हंगामी प्रशिक्षक म्हणाले की गेली २ वर्षे द्रविड यांना देशातील युवा गुणवत्तेला नवा चेहरा दिला आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.