शुक्रवार, २३ जून, २०१७

इस्रोने केले ३१ उपग्रहांचे प्रक्षेपण - २४ जून २०१७

इस्रोने केले ३१ उपग्रहांचे प्रक्षेपण - २४ जून २०१७

* इस्रोने शुक्रवारी सकाळी पीएसएलव्ही सी ३८ या अग्निबाणांद्वारे ३१ उपग्रहांचे प्रक्षेपण हे श्रीहरीकोटा येथील सतीश धवन तळावरून उड्डाण केल्यानंतर २७ मिनिटांनी पीएसएलव्ही कार्टोसॅट २ मालिकेतील २९ छोट्या उपग्रहाना आपल्या कक्षेत सोडले.

* इस्रोच्या पीएसएलव्हीचे हे ४० वे उड्डाण आहे. ३१ उपग्रहामध्ये भारताचे २ आणि २९ परदेशी उपग्रह आहेत. या उपग्रहामध्ये कार्टोसॅट मालिकेतील ६ वा उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला असून यामुळे भारताची टेहळणी क्षमता वाढणार आहे.

* या कार्टोसॅट वजन ७७२ किलो असून अन्य ३० उपग्रहांचे मिळून २७४ किलो वजन आहे.

[ उपग्रहाचे कार्य/उपयोग ]

* दहशहतवादी तळावर नजर ठेवण्यासाठी आणि पाकिस्तानी बंकर होण्यासाठी भारताने अवकाशात आणखी उपग्रह पाठवला आहे.

* यामुळे अर्धा स्केवर मीटर एवढ्या छोट्या आकाराची कोणतीही वस्तू हा उपग्रह टिपणार आहे. भारतीय सीमेपलीकडे पाकमध्ये होणाऱ्या हालचाली टिपता येणार आहेत.

* बंकरही लष्कराला दिसू शकणार आहे. त्याची माहिती दहशतवादी तळ उद्धवस्त करण्यासाठी लष्कराला मदत होणार आहे.

* यापूर्वी पाठवण्यात आलेल्या कार्टोसॅट मालिकेतील उपग्रहांनी लष्करासाठी मोठी मदत केली आहे. कार्टोसॅट द्वारे पाठवण्यात आलेल्या छायाचित्रांच्या मदतीनेच लष्कराने पाक सीमेवरील दहशतवाद्याने अनेक तळ उध्वस्त केले आहेत.0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.