मंगळवार, २० जून, २०१७

नासाला पृथ्वीसारखे दहा नवीन ग्रह सापडले - २१ जून २०१७

नासाला पृथ्वीसारखे दहा नवीन ग्रह सापडले - २१ जून २०१७

* नासाने २००९ मध्ये केप्लर ही दुर्बीण अवकाशात सोडली होती. ८ वर्षांपासून आकाशगंगेमध्ये नव्या ग्रहांचा शोध घेणाऱ्या केप्लर दुर्बिणीच्या निरीक्षणाचा हा शेवटचा टप्पा होता. यात शास्त्रज्ञाना यश आले आहे. 

* या दुर्बिणीच्या मिल्कीवे आकाशगंगेमध्ये पृथ्वीसारखे १० नवे ग्रह सापडले आहे. या दुर्बिणीच्या साहाय्याने पृथ्वीसारख्या आणि जीवसृष्टी असू शकणाऱ्या ग्रहांचा शोध घेण्यात सुरुवात केली होती. 

* केप्लर दुर्बिणीने पृथ्वीपासून उत्तरेला ३ हजार प्रकाशवर्षे दूर असणाऱ्या सिग्नस तारकासमूहातील २ लाखापेक्षा जास्त ग्रहांची निरीक्षणे करत नवे ग्रह शोधून काढले. 

* यामध्ये २१९ नवे ग्रह सापडले आहेत. त्यातील १० ग्रह पृथ्वीसारखे सापडले आहे. त्यावर जिसृष्टीची शक्यता नाकारता येत नाही. असे सांगण्यात आले. 

* या नव्या शोधानंतर मिल्की वे आकाशगंगेतील ग्रहांची संख्या ४०३४ झाली असून यातील ४९ ग्रहावरील परिस्थिती जीवसृष्टीसाठी पूरक आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.