मंगळवार, २७ जून, २०१७

कौशिक बसू यांची आंतरराष्ट्रीय आर्थिक महासंघाच्या अध्यक्षपदी निवड - २८ जून २०१७

कौशिक बसू यांची आंतरराष्ट्रीय आर्थिक महासंघाच्या अध्यक्षपदी निवड - २८ जून २०१७

* भारताचे माजी मुख्य आर्थिक सल्लागार कौशिक बसू यांची आंतरराष्ट्रीय आर्थिक महासंघाच्या [आयईए] अध्यक्षपदी सूत्रे २३ जून २०१७ रोजी हाती घेतली आहे. या पदाचा त्यांचा कार्यकाळ ३ वर्षाचा असेल. 

*  मेक्सिको येथे झालेल्या १८ व्या आयईएच्या जागतिक परिषदेच्या समारोपात सत्रात कॉर्नेल विद्यापीठाचे रवी कानबुर यांच्यासह बसू यांचेही भाषण झाले. 

* या भाषणापासूनच महासंघाच्या नेतृत्वस्थानी बसू यांच्या निवडीच्या चर्चेने मूळ धरलें असे कॉर्नेल विद्यापीठाने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.  याच विद्यापीठात इंटरनॅशनल स्टडी विभागात व्याख्याते म्ह्णून ते सध्या कार्यरत आहेत. 

* कौशिक बसू हे २००९ ते २०१२ या काळात भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून कार्यरत होते. तर २०१२ ते २०१६ दरम्यान जागतिक बँकेचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि मुख्य अर्थतज्ञ म्हणून त्यांची कारकीर्द राहिली आहे. 

* जगभरातील व्यवसायिक अर्थतज्ञाचे पुढारपण करणारा आघाडीचा महासंघ म्हणून आयईएचा लौकिक असून जागतिक स्तरावर आर्थिक धोरणाला वळण देण्याचे व संशोधनाचे काम हा महासंघ करत असतो. 

* आयईएच्या माजी अध्यक्षांमध्ये नोबेल विजेते केनेथ ऑरो, रॉबर्ट सोलोव, अमर्त्य सेन, आणि जोसेफ स्टिग्लिट्स यांचा समावेश आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.