शनिवार, ३ जून, २०१७

महाराष्ट्रात २७ लाख शेतकऱ्यांचे कर्जमाफीची मुख्यमंत्र्यांची घोषणा - ४ जून २०१७

महाराष्ट्रात २७ लाख शेतकऱ्यांचे कर्जमाफीची मुख्यमंत्र्यांची घोषणा - ४ जून २०१७

* राज्यातील ५ एकारपर्यंत शेतजमीन असलेले अल्पभूधारक आणि कर्ज थकीत असलेल्या २७ लाख शेतकऱ्यांचे ३० हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्याची दिलासादायक घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

* शेतकऱ्यांनी केलेल्या संपामुळे होणाऱ्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांशी चर्चा करून ही कर्जमाफी येत्या ३१ ऑकटोबर पर्यंत अमलात येईल असा शब्द मुख्यमंत्र्यांनी शेतकरी आंदोलकांना दिला.

* सरसकट सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची देण्याची शक्यता त्यांनी फेटाळून लावली. मात्र नियमितपणे कर्ज फेडणाऱ्या करणाऱ्या शेतकऱ्यांना निश्चितपणे काही दिलासा देण्याचे निर्णय घेतले जातील.

* ज्या २७ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे. त्यातील १५ लाख शेतकरी हे २०१२-१३ या दुष्काळी वर्षातील थकबाकीदार आहेत. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.