गुरुवार, १ जून, २०१७

महाराष्ट्रात बालविवाहाची कुप्रथा सुरूच राष्ट्रीय बालहक्क आयोगाचे संशोधन - २ जून २०१७

महाराष्ट्रात बालविवाहाची कुप्रथा सुरूच राष्ट्रीय बालहक्क आयोगाचे संशोधन - २ जून २०१७

* बालविवाहाला कायद्याने बंदी असताना देशातील ७० जिल्ह्यामध्ये ही कुप्रथा बेधडकपणे सुरु आहे. यात महाराष्ट्रातील तब्बल १६ जिल्ह्यांचा समावेश आहे.

* राष्ट्रीय बालहक्क आयोगाच्या सहकार्याने हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. मुंबई, पुणे, ठाणे, ते धुळे, भंडारा, चंद्रपूर या सर्व जिल्ह्यात अजूनही बालविवाहाचे प्रमाण वाढल्याचे आढळून आले आहेत.

* २००१ ते २०११ या दशकात देशभरातील ६४० पैकी ७० जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर बालविवाह झाल्याचे यंग लाईव्हस इंडिया या स्वयंसेवी संस्थेने राष्ट्रीय बाल हक्क आयोगाच्या मदतीने केलेल्या अभ्यासातून स्पष्ट केले आहे.

* या तिसऱ्या अहवालानुसार बालविवाहाचे प्रमाण ४७% आढळून आले. असे बाल कल्याण विभागाचे सचिव राकेश श्रीवास्तव यांनी सांगितले आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.