रविवार, २५ जून, २०१७

डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना - २६ जून २०१७

डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना - २६ जून २०१७

* महाराष्ट्र सरकारने सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागातर्फे ही डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरु केली आहे.

[ योजनेची उद्दिष्टे ]

* शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण पूर्ण करण्यासाठी या योजनेअंतर्गत आर्थिक मदत.

* भोजन, निवास व शैक्षणिक सुविधा भागवण्यासाठी आधार संलग्न बँक खात्यात रकमेचे हस्तांतरण.

* विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीकडे लक्ष.

* रुपये ४५,००० पासून रुपये ६५,००० पर्यंत प्रतिवर्ष लाभ.

* विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.

* विद्यार्थी मॅट्रिकोत्तर शिक्षण घेणारा असावा. त्याला १० वी व १२ वी मध्ये ६०% पेक्षा जास्तगुण आवश्यक आहेत.

* त्यासाठी पालकाचे वार्षिक उत्पन्न २,००,००० एवढे मर्यादित असावे.

* आवश्यक त्या कागदपत्रांची यादी व इतर सर्व माहिती sjsa.maharashtra.gov.in या संकेस्थळावर उपलब्द आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.