गुरुवार, २२ जून, २०१७

जगात ल्युएण्डा तर भारतात मुंबई सर्वात महाग शहर - २३ जून २०१७

जगात ल्युएण्डा तर भारतात मुंबई सर्वात महाग शहर - २३ जून २०१७

* मर्सर या संस्थेमार्फत दरवर्षी जगभरातील शहरातील जीवनावश्यक खर्चाबाबत सर्वेक्षण केले जाते. यंदा [२०१७] या सर्वेक्षणानुसार अँगोला देशाची राजधानी असलेले जगात ल्युएण्डा हे शहर हे जगात सर्वात महाग आहे.

* जगातील प्रथम १० महाग शहरे अनुक्रमें - ल्युएन्डा, हॉंगकॉंग, टोकियो, झ्युरिच, सिंगापूर, सेऊल, जिनिव्हा, शांघाय, न्यूयॉर्क, बर्न, या शहरांचा क्रमांक पहिल्या दहात लागतो.

* भारत देशाचा विचार केला तर या अहवालात देशात मुंबई प्रथम क्रमांकावर आहे. त्यानंतर दिल्ली, चेन्नई, बंगळुरू, कोलकाता या शहरांचा क्रमांक लागतो.

* जगाच्या तुलनेत मुंबई जगात ५४ व्या स्थानावर,दिल्ली ९९, चेन्नई १३५, बंगळुरू १६६, कोलकाता १८४ स्थानावर आहे.

* जगातील स्वस्त शहरे म्ह्णून ट्युनिस, बिशषेक, कोपजे, ब्लॅटयार, बिलिसी, मॉन्टेरेरी, सरजेवो, कराची, मिन्स्क जाहीर केले आहे.

* २०१६ साली मुंबई शहर या अहवालात ८२ व्या क्रमांकावर होते. तर २०१७ मध्ये ५४ व्या स्थानावर आहे. मुंबईने या क्रमवारीत ऑकलँड, पॅरिस, कॅनबेरा, सिएटल, व्हिएन्ना या मोठ्या शहरांना मागे टाकले आहे.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.