गुरुवार, २९ जून, २०१७

भारताचा अत्याधुनिक दळणवळण उपग्रह जीसॅट १७ चे प्रक्षेपण - ३० जून २०१७

भारताचा अत्याधुनिक दळणवळण उपग्रह जीसॅट १७ चे प्रक्षेपण - ३० जून २०१७

* भारताचा अत्याधुनिक दळणवळण उपग्रह जीसॅट १७ चे फ्रेंच गयाना येथील कोरौउ येथील अवकाश केंद्रातून यशस्वीपणे प्रक्षेपित करण्यात आला आहे.

* एकाच महिन्यात ३ उपग्रह अंतराळात सोडणाऱ्या भारताने जगाच्या नकाशावर आपले वेगळेपण नोंदविले आहे.

[ जीसॅट १७ ची वैशिट्ये ]

* इन्सॅट उपग्रहाद्वारे दळणवळण, हवामानविषयक माहिती, आपत्ती काळात उपयुक्त माहिती आणि संवाद सुविधा मिळणार आहे. जीसॅट १७ द्वारे नॉर्मल सी बँड, एक्सटेंडेंट सी बँड, एस बँड अशी सुविधा मिळणार आहे.

* फ्रेंच गयानातील कोरू येथून एरियन -५व्हीए, २३८ वाहकाद्वारे जीसॅट चे प्रक्षेपण करण्यात आले. प्रक्षेपानंतर लगेचच भारतातील मास्टर कंट्रोल येथील फॅसिलिटीने जीसॅटचा ताबा घेतल.

* जीसॅट १७ मुळे इस्रोच्या या कक्षेतील १७ दूरसंचार उपग्रहाच्या कार्याला अधिक बळकटी मिळणार आहे.

* जीसॅट १७ सोबत हेलास सॅट ३- इनमरसॅट हा उपग्रहदेखील सोडण्यात आला. या उपग्रहाचे वजन ३,४७७ किलो एवढे आहे. एरियान स्पेस द्वारे अवकाशात सोडलेला जीसॅट १७ हा इस्रोचा एकविसावा उपग्रह आह.

* कालबाह्य ठरू पाहणाऱ्या उपग्रहांना हा पर्याय असेल. तसेच अंटार्टिका मोबाईल सुविधेसाठी तो उपयुक्त ठरणार आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.