बुधवार, २१ जून, २०१७

वर्धा-यवतमाळ -नांदेड रेल्वे प्रकल्पावर थेट पंतप्रधानांचा वॉच - २२ जून २०१७

वर्धा-यवतमाळ -नांदेड रेल्वे प्रकल्पावर थेट पंतप्रधानांचा वॉच - २२ जून २०१७

* विदर्भ मराठवाड्याच्या दृष्टीने महत्वाच्या वर्धा-यवतमाळ -नांदेड रेल्वे प्रकल्पावर थेट पंतप्रधानांचा वॉच असणार आहे. या प्रकल्पाचा पंतप्रधानांच्या [प्रगती पोर्टल] मध्ये समावेश करण्यात आला आहे. 

* वर्धा-यवतमाळ -नांदेड हा २८४ किलोमीटर ब्रॉडगेज रेल्वे प्रगतीचा आढावा आतापर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वॉर रूम मधून घेतला जात होता. 

* आता हा प्रकल्प पंतप्रधानांच्या प्रगती पोर्टलच्या माध्यमातून थेट प्रधानमंत्री मोदीजी २८ जूनला व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे आढावा घेणार आहेत. या प्रगती पोर्टलवर देशातील १० प्रकल्पांचा समावेश आहे. 

* ११ फेब्रुवारी २००९ साली तत्कालीन रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांच्या हस्ते या मार्गाची मुहूर्तमेढ सुरु झाली. आता प्रगती पोर्टलमध्ये या प्रकल्पाचा समावेश झाला असून हा प्रकल्प लवकर पूर्ण होऊ शकतो. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.