मंगळवार, ६ जून, २०१७

शेरबहादूर देऊबा नेपाळचे नवे पंतप्रधान - ७ जून २०१७

शेरबहादूर देऊबा नेपाळचे नवे पंतप्रधान - ७ जून २०१७

* नेपाळचे वरिष्ठ नेते शेरबहादूर देऊबा यांची आज देशाचे ४० वे पंतप्रधान म्ह्णून निवड करण्यात आली आहे.

* नेपाळच्या संसदेत आज झालेल्या मतदानात त्यांना संसद सदस्यांनी बहुमताने नियुक्त केले आहे. ते चौथ्यांदा पंतप्रधानपदावर निवडून आले.

* पुष्पकमल दहल यांनी गेल्या महिन्यात पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झाले होते. या पदासाठी नेपाळ काँग्रेसचे नेते असलेले शेरबहादूर देऊबा हे एकमेव नेते उमेदवार होते.

* ७० वर्षाचे देऊबा हे नेपाळी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली जुलै २००५ मध्ये दोन वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा. मात्र फेब्रुवारी २००६ मध्ये सुटका.

* दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची मानद डॉकटरेट पदवी प्राप्त. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.