रविवार, २५ जून, २०१७

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला कॅबिनेटची मंजुरी - २५ जून २०१७

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला कॅबिनेटची मंजुरी - २५ जून २०१७

* राज्यातील दीड लाखापर्यंत शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीची घोषणा करण्यात आली आहे. राज्याच्याच नव्हे तर देशाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा निर्णय असून त्यामुळे महाराष्ट्रातील ८९ लाख शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. 

* छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा दिलासा मिळणार आहे. असा मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. 

[ कर्जमाफी निकष ]

* १ एप्रिल २०१२ ते ३० जून २०१६ या कालावधीत थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांचे दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ होणार आहे. 

* दीड लाखाहून अधिक थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक वेळा समझोता योजना. 

* समझोता योजनेत थकबाकीच्या रकमेच्या २५% किंवा दीड लाख रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल त्या रकमेचा शेतकऱ्यांना लाभ. 

* मुदतीत कर्ज फेडलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून पीक कर्जाच्या २५% किंवा २५ हजार रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल ती दिली जाणार आहे. 

* प्राप्तिकर भरणारे तसेच व्यापारी आणि वॅटला पात्र असणाऱ्यांना कर्जमाफीतून वगळण्यात आले आहेत.

[ यापूर्वी झालेली कर्जमाफी ]

* भारत - ५२,००० कोटी 
* तेलंगणा - १५,००० कोटी 
* आंध्र प्रदेश - २०,००० कोटी  
* पंजाब - १०,००० कोटी 
* कर्नाटक - ८,१६५ कोटी 

[ निरनिराळ्या राज्यात प्रतिकुटुंब शेतीकर्ज ]

* केरळ - २,१३,००० रुपये 
* आंध्रप्रदेश - १,२३,४०० रुपये 
* पंजाब - १,१९,००० रुपये 
* तामिळनाडू - १,१५,९००
* कर्नाटक - ९७,२०० रुपये 
* तेलंगणा - ९३,५०० रुपये 
* हरियाणा - ७९,००० रुपये 
* राजस्थान - ७०,५०० रुपये 
* महाराष्ट्र - ५४,७०० रुपये 


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.