शुक्रवार, २ जून, २०१७

स्वदेशी बनावटीच्या पृथ्वी २ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी - ३ जून २०१७

स्वदेशी बनावटीच्या पृथ्वी २ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी - ३ जून २०१७

* भारताकडून शुक्रवारी स्वदेशी बनावटीच्या अणवस्त्रक सज्ज पृथ्वी २ या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात आली.

* पृथ्वी २ जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र असून या क्षेपणास्त्राच्या साहाय्याने ३५० किलोमीटरवरील लक्ष्याच्या अचूक वेध घेता येऊ शकतो.

* ओडिशाच्या चांदीपूर येथील एकात्मिक चाचणी तळावरून [आयटीआर] येथून सकाळी मोबाईल लॉंचरच्या साहाय्याने पृथ्वी २ क्षेपणास्त्र डागण्यात आले.

* पृथ्वी २ या क्षेपणास्त्रात द्रव इंधन असणाऱ्या दोन इंजिनाचा [लिक्विड प्रोपलशन] यांचा वापर करण्यात आला. याशिवाय या क्षेपणास्त्रात ५०० ते १००० किलो अणवस्त्रे वाहून नेण्याची क्षमता आहे.

* या क्षेपणास्त्राचा वापर लक्ष्याचा अचूक वेध घेणे, क्षेपणास्त्राचा मार्ग संरक्षण संशोधन व विकास संस्थेचे रडार, विद्युत प्रकाशीय मागोवा यंत्रणा, दुसंवेदन केंद्रे यांच्या मदतीने निश्चित करण्यात आले आहे.

* पृथ्वी २ हे क्षेपणास्त्र भारताच्या लष्करी दलामध्ये समाविष्ट करण्यात आले असून भारताच्या एकात्मिक क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमात तयार केलेले ते पहिले क्षेपणास्त्र मानले जाते.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.