शुक्रवार, ३० जून, २०१७

श्रीलंकेचा गोलंदाज लसिथ मलिंगावर एक वर्षांसाठी बंदी - १ जुलै २०१७

श्रीलंकेचा गोलंदाज लसिथ मलिंगावर एक वर्षांसाठी बंदी - १ जुलै २०१७

* श्रीलंका क्रिकेट मंडळाची परवानगी न घेता माध्यमांशी बोलल्याबद्दल श्रीलंकेचा गोलंदाज लसिथ मलिंगावर एक वर्षांसाठी बंदी घालण्यात आली आहे.

* चॅम्पियन ट्रॉफीच्या नंतर मायदेशी परतल्यानंतर श्रीलंकेच्या क्रीडामंत्र्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या लसिथ मलिंगाला चौकशीला सामोरे जावे लागले.

* श्रीलंका क्रिकेट कमिटीने त्याच्या चौकशीसाठी तिनस्तरीय समितीची नियुक्ती केली आहे. या समितीच्या अहवालांनंतर मलिंगावर आचारसंहितेचा भंग केल्याचा ठपका लावला होता.

* मलिंगावर १ वर्षाची बंदी घालताना त्याच्या सामन्याच्या मानधनातून ५०% दंडही वसूल करण्याचे आदेश मंडळाकडून देण्यात आले आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.