सोमवार, २६ जून, २०१७

हरियाणाची मनुषी छिल्लर २०१७ ची फेमिना मिस इंडिया - २७ जून २०१७

हरियाणाची मनुषी छिल्लर २०१७ ची फेमिना मिस इंडिया - २७ जून २०१७

* हरियाणाची मनुषी छिल्लर २०१७ ची फेमिना मिस इंडिया ठरली आहे. जम्मू काश्मीरची साना दुआ पहिली उपविजेती, तर बिहारची प्रियांका कुमारी दुसरी उपविजेती ठरली.

* दिल्लीच्या सेंट थॉमस शाळेत आणि सोनपतमधील भगत फुल सिंग वैद्यकीय महाविद्यालयात मनुषीच शिक्षण झाले.  आणि तिचे आई आणि वडील डॉक्टर आहेत.

* आयुष्यात अनिश्चितता ही एकमेव घडणारी गोष्ट आहे. फेमिना मिस इंडियाच्या किताबाबद्दल ही अनिश्चितता मला भावते असे तिने म्हटले.

* विनाली भटनागरला मिस ऍक्टिव्हचा क्राऊनने सन्मानित करण्यात आले. तर वामिका निधीला बॉडी ब्युटीफुल हा अवॉर्ड देण्यात आला.

* अंतिम फेरीत स्टेफनी डेल व्हॅले, अर्जुन रामपाल, बिपाशा बसू, मनीष मल्होत्रा,  अभिषेक कपूर, विद्युत जमवाल, एलियाना डिक्रूज यांनी परीक्षण केले.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.