सोमवार, २६ जून, २०१७

चीनमध्ये धावली ४०० किमी प्रतितास धावणारी पहिली बुलेट ट्रेन - २७ जून २०१७

चीनमध्ये धावली ४०० किमी प्रतितास धावणारी पहिली बुलेट ट्रेन - २७ जून २०१७

* चीनमधील बीजिंग ते शांघाय या अत्यंत व्यस्त मार्गावर ४०० किमी प्रतितास इतका वेग असलेली बुलेट गाडी प्रथमच धावली. सदर गाडीची रचना आणि उत्पादन चीनमध्येच करण्यात आली.

* बीजिंगवरून शांघायला पोहोचण्यासाठी गाडीला ५ तास ४५ मिनिटाचा कालावधी लागणार आहे. वाटेत ही गाडी १० स्थानकावर थांबणार आहे.

* सदर बुलेट ट्रेन ईएमयू म्हणून ओळखली जाते. ती जास्तीत जास्त ४०० किमी प्रतितास वेगाने धावणार आहे. वाटेत ही गाडी १० ठिकाणी थांबणार आहे.

* बीजिंग ते शांघाय हा चीनमधील अत्यंत गजबजलेला मार्ग असून दररोज ५० लाखाहूंन अधिक प्रवाशी तेथे येजा करत असतात.

* चीनमध्ये जगातील सर्वात लांब रेल्वेप्रणाली आहे. सदर बुलेट ट्रेन आपल्या मार्गात जिआन, शानडोंग, प्रांत आणि तिआन प्रांत येथे थांबणार आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.