रविवार, १८ जून, २०१७

इंडोनेशिया ओपनचे पुरुष एकेरी विजेतेपद किदांबी श्रीकांतकडे - १९ जून २०१७

इंडोनेशिया ओपनचे पुरुष एकेरी विजेतेपद किदांबी श्रीकांतकडे - १९ जून २०१७

* भारतीय बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांत याने रविवारी अंतिम सामन्यात जपानचा काजूमासा सकाई याच्यावर सरळ गेम्समध्ये विजय नोंदवत इंडोनेशिया ओपनचे पुरुष एकेरी विजेतेपद आपल्या ताब्यात घेतले.

* श्रीकांतचे हे सुपर सीरिजचे तिसरे विजेतेपद आहे. सिंगापूर ओपनच्या फायनलमध्ये पोहोचणारा जगातील २२ व्या क्रमांकावरील खेळाडू श्रीकांतने जपांनच्या सकाई याचा २१-११-२१-१९ असा पराभव केला.

* श्रीकांतचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष हेमंत विश्व सरमा यांनीदेखील अभिनंदन केले आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.