मंगळवार, २० जून, २०१७

हैद्राबाद शहरात वायफाय सेवा सुरू - २१ जून २०१७

हैद्राबाद शहरात वायफाय सेवा सुरू - २१ जून २०१७

* तेलंगणा सरकारने हैद्राबाद शहरात वायफाय सेवा सुरु केली आहे त्याअंतर्गत हैद्राबाद शहरात १००० पेक्षा जास्त सार्वजनिक स्थानावर वायरलेस नेटवर्किंगच्या माध्यमातून ही सेवा प्रदान केली जाते.

* त्याचप्रमाणे शहरात क्रमाक्रमाने ३००० सार्वजनिक ठिकाणी ही सेवा लागू केली जाईल. पहिल्या टप्प्यात फक्त १००० सार्वजनिक ठिकाणी सेवा सुरु करण्यात आली आहे.

* या सेवेच्या अंतर्गत वापरकर्त्याला ५-१० mbps च्या स्पीडच्या माध्यमातुन ३० मिनिट निःशुल्क वायफाय सुविधा देण्यात येईल.

* ही सर्व योजना ३०० करोड रुपयाची असून असे तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी सांगितले.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.